ब्लॉगर मध्ये ब्लॉग तयार करण्यासाठी सर्व प्रथम आपल्या कडे एक गुगल ई मेल खाते असणे आवश्यक आहे.आपल्याकडे असणा-या gmail ने सर्व प्रथम www.blogger.com या वेबसाईटवर जा तेथे, आपल्या जी मेल खात्याने लॉग इन व्हा. लॉग इन केलंत की खालच्या चित्रात दर्शविल्याप्रमाणे Sign Up for Blogger असं लिहिलेली एक विंडो उघडेल.तेथे Display name च्या समोरील लाल चौकोनात blog असे लिहिलेले आहे,तेथे तुम्हाला तुमच्या ब्लॉगला जे नाव हवे असेल ते अगदी स्पेलिंग न चुकता लिहा.Email notifications च्या समोरील चौकोनात क्लिक करून बरोबरची खूण करा.त्याच प्रमाणे Acceptance of Terms च्या समोरही वरील प्रमाणे खूण करा.
आता CONTINUE असे लिहिलेल्या बाणावर क्लिक करून पुढे जा जर तुमचं नाव आधी कोणत्याही ब्लॉगला दिलेलं नसेल किंवा उपलब्ध असेल तर तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्ग मिळतो. मात्र जर तुमचं नाव एकमेव नसेल, तर तुमच्यासाठी एक पर्यायी विंडो उघडते. खालील नंबर दोनच्या विंडोमध्ये लाल चौकोन दाखवलेल्या Blog title च्या समोर तुम्हाला हवं असलेलं नाव लिहा.हे नाव तुम्ही परत केव्हाही बदलू शकता.
आता सर्वात महत्वाचे म्हणजे Blog address (URL) म्हणजेच तुमच्या ब्लॉगची लिंक टाका,आणि त्याच खाली असलेल्या निळ्या रंगातील Check Availability वर क्लिक करून ते नाव उपलब्ध आहे का? ते तपासा उपलब्ध असेल तर This blog address is available आसा संदेश येईल.CONTINUE नाव असलेल्या बाणावर पुढे जा आता तुम्हाला ब्लॉगसाठी टेम्पलेट निवडायची आहे. ब्लॉगरमधे उपलब्ध असलेल्या विविध टेम्पलेटपैकी कुठलीही एक टेम्पलेट तुम्ही निवडू शकता. टेम्पलेट निवडल्या नंतर पुढे आता टेम्पलेट निवडून झाल्यावर तुम्ही CONTINUE ह्या बटणावर क्लिक केलंत की Start Blogging ही विंडो उघडते. ज्यात तुम्ही आपले पोस्ट लिहू शकता.
आश्या प्रकारे आपण पोस्ट लिहू शकता.याच ब्लॉगर खात्या वरून आपण आपल्या स्वत:चे संकेतस्थळ बनवू शकता.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा